राळेगाव नं.पं च्या पाठपुराव्यामुळे अखेर नं.पं.ला. मिळाले अग्निशामक वाहन

.

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव नगर पंचायत च्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर नगर पंचायत राळेगाव ला अग्निशामक वाहन मिळाले.
राळेगाव नगर पंचायतीला
नविन १ अग्निशामक वाहन खरेदी करण्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्याधिकारी नगर पंचायत राळेगाव यांचे संदर्भिय पत्र.क्र.६/७ अन्वये तांत्रिक मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले होते.सदरचे प्रस्तावास यवतमाळ जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय समिती आणि प्रशासकीय परिषद समिती यांचे दिनांक ३०/११/२०२३ रोजीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार सदर प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
उपरोक्त संदर्भाकित शासन निर्णय अधिसुचनेनुसार यवतमाळ जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे व सर्व प्रकरणात निधी वितरणाचे अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा खनिज प्रतिष्ठान यवतमाळच्या व्यवस्थापकीय समिती यांना प्रदान केलेले आहे.

त्यास अनुसरून राळेगाव नगर पंचायतीला नविन १ अग्निशामक वाहन खरेदी करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्याधिकारी नगर पंचायत राळेगाव यांचे कडून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला होता.

त्यामुळे नगर पंचायत राळेगाव मध्ये अतिमहत्त्वाचे असलेले अग्निशामक वाहन दाखल झाले आहे.या अग्निशामक वाहनाचे राळेगाव नगरपंचायत चे नगराध्यक्ष रवींद्र शेराम ,उपाध्यक्ष,जानरावजी गीरी सर्व विषय समितीचे सभापती, नगरसेवक,नगरसेविका व नागरिक यांनी रितसर पुजन करून आनंद व्यक्त केला. अग्निशमन दलाच्या गाडीवर चालक आणि तांत्रीक कर्मचारी यांची लवकरच नेमणूक होऊन हे वाहन जनतेच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती नगराध्यक्ष रवींद्र शेराम यांनी दिली.