
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
तालुक्यातील पळसपुर येथील गावठाण डी पि वरुन गावात विज पुरवठा केला जातो तो रात्री बे रात्री केंव्हाही बंद होत असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून येथील विज पुरवठा सुरळीत नसल्याने गावातील दळणवळणाचे साधण पिठाची गिरणी बंद असल्याने माहावितरण कंपनी च्या नावाने सिंमगा होत असल्याने प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत संगठन समिती चे मिडिया जिल्हा अध्यक्ष नागोराव शिंदे पळसपुरकर यांनी आज उपविभागीय अधिकारी नागेश लोने यांना निवेदन देऊन पळसपुर येथील गावठाण डी पि वर अर्थिंग करणे , केबल बसवणे , किटकॅट फ्युज बसवणे , नागनाथ डीपीवरील पंधरा पोलचि वायरिंग टाकने , पूर्ण गावठाण मधील वायरिंग ओढणे ,सिंगल डीपीवर शंभर चा डीपी बसवणे, गावठाण मध्ये केबलची वायरिंग करने ,अशा सहा मागण्या चे निवेदन आज कार्यकारी अभियंता भोकर यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत दिले आहे वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
