मृतदेहासह नातेवाईकांचा मारेगाव पोलीस स्टेशन समोर ठिय्या,नात पळून गेल्याचा धक्का सहन न झाल्याने. आजीची आत्महत्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

प्रियकरासोबत नांत पळवून गेली असल्याने हा धक्का सहण न झाल्याने..आजीने चक्क उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील खैरगाव (भेदी) येथे घडली.

आजीच्या मृत्यूचा हंबरडा फोडत..मृतदेह चक्क मारेगाव ठाण्यात आणला व मुलीसह प्रियकराला अटक करा नातेवाईक यांनी चक्क मारेगाव पोलीस स्टेशन समोर…ठिय्या आंदोलन केले…तणावसदृश परिस्थितीवर तब्बल एक तासाने हाताळण्यात पोलिसांना यश आले.
मारेगाव तालुक्यातील खैरगाव (भेदी ) येथील २१ वर्षीय तरुण व १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मागील काही वर्षांपासून प्रेमात आकंठ बुडाले.हळुवार रंगीबेरंगी प्रेम बहरत असतांना त्यांनी पळून जाण्याचा बेत आखला आणि त्यावर शिक्कामोर्तबही केला.मागील आठ दिवसांपूर्वी पळून गेलेल्या प्रेमयुगुलातील अल्पवयीन मुलीच्या मामाने मारेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यानुसार ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान , पळून गेलेल्या नातीच्या आजीने पलायनाचा चांगलाच धसका घेत व मुलांकडील गणगोतांनी दिलेल्या धमकीवजाने चक्क शनिवार च्या रात्रीला विष ग्रहण केले.या गंभीर अवस्थेत तिला पांढरकवडा रुग्णालयात दाखल केले व डॉक्टरांनी आजी गिरजाबाई नागो मांजरे (६०) हिला मृत घोषित केले.या गंभीर घटनेने नातेवाईकात प्रचंड संतापाची लाट उसळत मृतदेह थेट मारेगाव पोलिसात आणला व मुलीला आणून द्या ..तिच्या साठी आजीने इहलोकाची यात्रा केली.ही मागणी करीत नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोरच मृतदेह ठेवत आक्रोश करीत ठिय्या केला.
काही वेळ तणाव सदृश वातावरण तयार झाल्याने पोलीस प्रशासनाने तक्रार दाखल करून तपास गतिमान करण्यावर भर देण्याचे सूतोवाच करण्यावर नातेवाईकांना भर दिला.तक्रार करीत मृतदेह गावाकडे रवाना केलाय .मात्र , काही काळ तणावात असलेल्या पोलीस प्रशासनाची पुरती भंबेरी उडाली अन तब्बल तासाभरानंतर हा तणाव निवळत प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.