
वरोरा दिनांक 14 ऑगस्ट
बांगलादेशामध्ये सातत्याने हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत वरोरा शहरात शुक्रवार दि 16 ऑगस्ट ला निषेध मोर्चाचे आयोजन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आलेले आहे
यावेळी हा मोर्चा राम मंदिरातून निघेल आणि सराफा लाईन च्या मार्गाने गांधी चौकात जाईल. या ठिकाणी एका सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध वक्ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. त्यानंतर मोर्चातील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे तहसील कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.
या मोर्चात मध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनांनी केलेले आहे
