
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी..
ढाणकी बाजारपेठ हे आजूबाजूच्या खेड्यासाठी खूप महत्वाची ठरते. कारण सर्व खरेदी विक्रीची व्यवहारे करण्यासाठी अनेक गावचे गावकरी ढाणकीला येत असतात. त्यातल्या त्यात सोमवार हा बाजाराचा दिवस असल्या कारणाने अनेक गावचे ग्राहक खरेदी साठी येत असतात पण शहरात एकही मुत्रीघर असल्याचे आढळत नाही. आणि असले तरी ते सुस्थितीत आहे का नाही बघायला कोणी वाली नाही. अशी परीस्थीतीती असल्याकारणाने अनेक लोकांची कुचंबणा होताना बघावयास मिळत आह्रे. किमान २ राष्ट्रीयकृत बँका आणि पथसंस्थेचे असे मोठे बँकिंग जाळे शहरात अस्तित्वात असल्यामुळे ईथ सतत गर्दी व लोकांची येजा असते. पण येणाऱ्या परगावच्या माणसांची व गावातील व्यापारी बांधवांची येथे मुत्रीघरावाचून अडचण निर्माण होताना बघायला मिळते आहे.तसेच सर्वसामान्य जनता करेल तरी काय पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली नसल्यामुळे सध्या जनतेने गुरांच्या दवाखान्या मागेच मुत्रीघर बनवले आहे. बाहेरगावचे पाहुणे आल्यास त्यांना देशी दारूचे दुकान अगदी कष्ट न करता सापडेल पण मुत्रीघर मुळीच सापडणार नाही शहरात अनेक किराणा दुकाने, कृषी केंद्र, कापड दुकाने आहेत. त्या कारणाने अनेक व्यापारी वर्ग सुद्धा शहरात येतच असतात. पण लघुशंका करावयाची असल्यास त्यांना सुद्धा या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.दारूचा परवाना काढावयाचा असल्यास राजकारणी “हम साथ साथ है” म्हणत एकमेकांना सहकार्य करतील पण मुत्री घरासाठी मात्र का बरं वेळ लागत असेल.
