शेतकरी सुनील नारायण कोहपरे यांनी 9 जून 2025 रोजी त्रिमूर्ती कृषी केंद्र, माढेळी येथून रासायनिक खत खरेदी केले. बिल क्रमांक 1008 नुसार ₹3117.50 रोख देण्यात आले. त्या खरेदीसंदर्भात कोहपरे यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली असून, 15 सप्टेंबर 2025 रोजी पंचनामाही करण्यात आला.
परंतु, आज दिनांक 14 ऑक्टोबर 2025 पर्यंतही या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही.
“तक्रार दिल्याला महिनाभर झाला, पंचनामा झाला… पण पुढचं काहीच नाही. अधिकारी झोपले आहेत का?” — असा थेट सवाल सुनील कोहपरे यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाकडून दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचनामा करून प्रकरण थंडावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
काही राजकीय लोकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता, पण शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि संघर्षामुळे अखेर कृषी अधिकाऱ्यांना चौकशी सुरू करण्यास भाग पाडले गेले.
आता प्रश्न असा — या तक्रारीवर कारवाई कधी होणार?
फक्त पंचनामा दाखवण्यासाठी झाला की खरोखरच न्याय मिळणार?
हे पाहणं आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
