
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे झालेल्या केंद्रस्तरीय खेळ स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळा खैरी च्या विद्यार्थ्यांनी ब मध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या कबड्डी सामन्यामध्ये दहेगाव शाळा संघाचा पराभव करून खैरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी विजय प्राप्त केला. व पुढील बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेस पात्र ठरला.
कबड्डी या खेळामध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यात खैरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवून यश संपादन केले. खैरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाला शाळेतील सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या यशाचे श्रेय शाळेतील समस्त शिक्षक वर्गांना दिले. केंद्रस्तरीय स्पर्धेत विजय प्राप्त केल्याबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी च्या विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक व गावकर्याकडून कौतुक करण्यात आले. व आता पुढील बीटस्तरीय व तालुकास्तरीय सामन्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे सर्व शिक्षक श्री. संजय खडसे मुख्याध्यापक, सुरेश सलाम, प्रवीण दिडपाये, राजेंद्र दूरबुडे, राजकुमार शिंदे, वसंत खाडे, व सरोजताई शेंडे मॅडम त्यांचे गावकर्याकडून अभिनंदन करण्यात आले.
