अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर धडक कारवाई,महसूल विभाग अँक्शन मोडवर आल्याने अवैध रेती वाल्यांचे धाबे दणाणले

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील मौजा धानोरा येथील तलाठी शिवानी सातोकर, तलाठी तिरणकर, उपविभागीय अधिकारी वाहन चालक सुरज पारडी, कोतवाल धानोरा अंकित पाटील यांनी दि 28 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान पोहणा जि वर्धा येथील अवैध रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर आढळला तर सदर ट्रॅक्टर जप्त केला व पंचनामा करून पुढील दंडात्मक कारवाई करिता तहसील कार्यालय राळेगाव येथे जमा करण्यात आला आहे.