यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री-परिचर संघटना जिल्हा शाखा यवतमाळ च्या वतीने अंशकालीन स्त्री -परिचर यांच्या प्रलंबित मागण्यां व समस्यांना घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१५-०६-२०२६ रोजी ११ वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा श्रमशक्ती भवन आयुर्वेदिक दवाखाना यवतमाळ येथुन निघेल अंशकालीन स्त्री -परिचरांना मीळत असलेले दरमहा तीन हजार मानधनात दिनांक ०१ एप्रिल २०२६ पासून दरमहा रू.३०००/- माणधन वाढ करण्यात आली आहे परंतु अद्याप अंशकालीन स्त्री – परिचरांना दरमहा रू.६०००/- मानधन अदा करण्यात आले नाही तसेच अंशकालीन स्त्री -परिचर ह्या अर्धवेळ कर्मचारी असून सुद्धा आरोग्य कर्मचारी त्यांच्या कडून पुर्ण वेळ काम करून घेत आहेत. स्त्री -परिचर ह्या तुटपुंज्या मानधनावर काम करीत असुन तेही दर महिन्याला मीळत नाही त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे मागण्या (१) अंशकालीन स्त्री -परिचरांना सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक: बैठक -२०२२ /प्र.क्र.११५ /सेवा- ०२ (ई-७२५९७६) गोकुलदास तेजपाल रूग्णालय आवार संकुल नवीन मंत्रालय, मुंबई दिंनाक १७ मार्च २०२६ नुसार दि.०१ एप्रिल २०२६ पासून दरमहा रू.६०००/- मानधन फरक बिलासह अदा करा.तसेच शासन परिपत्रकात नमूद केल्या प्रमाणे मानधन दरमहीण्याच्या १० तारखे पर्यंत द्या.(२) अंशकालीन स्त्री -परिचर यांना दरमहा किमान वेतन रू.२६,०००/- मानधन/वेतन द्या.(३) अंशकालीन स्त्री किंवा परिचर यांचे नाव बदलून त्यांना केवळ स्त्री परिचर संबोधण्यात यावे.(४) अंशकालीन स्त्री परिचर यांना रजा सुट्याचा लाभ द्यावा(५) आरोग्य खात्यात कायम करा.(६) सामाजिक सुरक्षा पेन्शन लागू करा (७) अंशकालीन स्त्री -परिचर यांचे सेवावृत्तीची वयोमर्यादा ६५ करा (८) अंशकालीन स्त्री परिचरांना वर्षातून एकदा गणवेश व ओळख पात्रासाठी निधी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. काहींना अद्याप गणवेश आणि ओळख पत्र मिळाले नाही त्यांना वाटप करा. (९) अंशकालीन स्त्री -परिचर यांना जाब कार्ड द्या या सह इतरही मागण्यांना घेऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले तरी सर्व अंशकालीन स्त्री -परिचर यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कॉ.दिवाकर नागपुरे, वैशाली निंबर्ते, अर्चना चिकटे, कुसुम मानकर, ज्योती राठोड, सरस्वती गोलाईत, शीला रोकडे, पारूबाई देशमुख, निशा आडे, पुण्यरथा काष्टे, लताबाई कांबळे, लीला पवार, कमलबाई कांबळे, लक्ष्मी मानतुटे, पदमीनी ठाकरे, निर्मला कोव, वर्षा तोडसाम, सोनाली कडुकार, कल्पना सवाईमुन, प्रतीक्षा सुकळकर ,सुमन पाटमाशे , राजकन्या दातार, वंदना दुधे, प्रिती ठाकरे, रूपाली, आत्राम, मयुरी भोयर, धोंडाबाई आगोसे, देवांगना पोलेवार, मंगला सिडाम, आशा कांबळे, कल्पना गुडदे, संगीता राऊत, सुरेखा पढाल, कमलबाई वेले, उषाताई राजुरकर, उषाताई राठोड, वंदना मांगुळकर, वंजेमाला राठोड, साधना गवळी, पुष्पा घाटोळे, शेवंता पवार, सविता पवार, दुर्गा कोटनाके, वंदना सगरूळे, कुसुम जोगदंड, शीलाबाई मस्के, अंजनाबाई सरगुंडे, बेबी वल्के, शिला सुरधुसे, जयश्री मरापे, सुनिता भस्मे, पार्वती दाते, मंदा राऊत, शोभा वावरे, शोभा झाडे, यमुना करपते, सायराबी मुसा , संगीता नेवारे, यमुना कांबळे, प्रभा कांबळे, यशोदा चव्हाण, मीरा वाघमारे, शोभा झाडे, सुमीत्रा व्यवहारे , नंदा शेळके, बेबी कांबळे, गीता कुळमेथे , संगीता पीस्तुलकर , हंसमाला शेंडे, रमाबाई शंभरकर, यशोदा झांबरे, संगीता म्हैसकर, कांताबाई रोकडे, जमुना गंगावणे, जिजा रिंगने , सुमनबाई कोरे, बेबी ठाकरे, शशीकला भगत, विठाबाई डोलारकर, छाया देवतळे, शारदा मीसाळ , यांनी केले आहे.
