पिवरडोल येथील नरभक्षी वाघ अखेर जेरबंद,रेस्क्यू टीम ने केले जेरबंद

प्रतिनिधी:सुमीत चाटाळे

झरी तालुक्यातील पिवरडोल येथे  दिनांक 11 जुलै रोजी अविनाश पवन लेनगुरे (वय 19 वर्षे) हा युवक वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता, व संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती व गाव शिवारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

आज रोजी पिवरडोल येथील त्या आक्रमक झालेल्या वाघाला जेरबंद करण्यासाठी नागपूर, अमरावती, बुलढाणा येथील तीन रेस्क्यू टीम पिवरडोल येथे दाखल झाली होती. या टीमने वाघाला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जेरबंद केले आहे. व वाघाला नागपूर येथे नेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे..