के. बी .एच.विद्यालय पवन नगर येथे संस्थेच्या कोषाध्यक्षा मा.डॉ.सौ.स्मिता ताईसाहेब प्रशांंतदादा र्हिरे यांचा वाढदिवसानिमित्त हिमोग्लोबीन (C.B.C.)तपासणी शिबिर


के.बी .एच,विद्यालय पवन नगर येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीच्या कोषाध्यक्षा मा.डॉ.सौ.स्मिता ताई प्रशांतदादा हिरे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यालयात हिमोग्लोबीन (C.B.C.)तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. उमेश देवरे सर होते. Metropolis संस्थेचे मा. डॉक्टर संदीप साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असावे व ते कमी असल्यास वाढविण्यासाठी आहार कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक श्री उमेश देवरे यांनी अध्यक्षीय मनोगतात मा. सौ.स्मिता ताईसाहेबांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती दिली तसेच त्यांचे स्वभाव गुण विद्यार्थ्यांना सांगितले व ताईसाहेबांना विद्यालयाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री प्रदीप हिरे, दीपा जाधव तसेच. ,सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय पवार यांनी केले व आभार कविता सोनवणे मँडम यांनी मानले.