
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्रीराम बहुउद्देशिय विकास मंडळ राळेगांव द्वारा संचालीत श्रीराम गो-शाळा शाखा निमगव्हाण चा गोवंश निवारा शेडचा भुमिपुजन समारंभ दिनांक ०७/१०/२०२४ रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ. सविताजी राऊत (सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यवतमाळ) कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.डॉ. अशोक उईके सर (माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा राळेगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार) तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मा.डॉ. धनश्री डिडोळकर (सहआयुक्त पशुसंवर्धन ता. घाटांजी) मा.डॉ. सुरेंद्र हाडोळे (पशुधन विकास विस्तार अधिकारी पं.स. राळेगांव) मा. डॉ. रंजित नाळे (पशुधन विकास अधिकारी पशु. वैद्य. दवा. श्रेणी १ राळेगांव), मा. भुपेंद्रभाई कारीया (राळेगांव तालुका संघ चालक राष्ट्रीय स्वयंसेवा संघ), मा. अंकुशजी रामगडे (यवतमाळ विभाग कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवा संघ), मा. विनयजी मुनोत (अध्यक्ष मेडीकल असोसीएशन व सचिव जैन संघ) उपस्थित होते. या उद्घाटणप्रसंगी मा. अशोकराव उईके सर उद्भोदन करतांना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील गौ-शाळांना गो-भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यात श्रीराम गो-शाळा शाखा निमगव्हाण ला गो-भवन बांधण्यासाठी २० लक्ष निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच गो मातेला राजमातेचा दर्जा दिला असे सांगीतले. त्यामुळे गोसंवर्धन व गोवंश वृध्दी होण्यास मोठी मदत होईल. गो-शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन प्रति दिन प्रति गाय ५० रू. चाऱ्यासाठी अनुदान देणार असल्याचे सांगीतले.
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. सविताजी राऊत यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधा व योजनांची माहिती दिली. तसेच डॉ. रंजित नाळे यांनी उद्भोदनात राळेगांव तालुक्यातील हि उत्तम गो-शाळा असुन याा गो-शाळेतील १४५ गो-वंशाचे Ear Tagging करण्यात आलेले आहे. तसेच वेळोवेळी गो-वंशाची आरोग्य तपासणी व लसीकरण आम्ही करत असतो असे सांगीतले. आणी या गो-शाळेचे अध्यक्ष श्री. विनोद क्षिरसागर यांचे गोसमर्पण भावनेने करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. धनश्री डिडोळकर, डॉ. रंजित हाडोळे व श्री. विनयजी मुणोत यांनी सुध्दा या गो-शाळेला आर्शिवचन दिले व भविष्यात या गोशाळेला वेळोवेळी मार्गदर्शन व मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्री. भुपेंद्रभाई कारीया यांनी २०१२ पासून ते २०२४ पर्यंतचा गो-शाळेच्या वाटचालीचा आढावा मांडला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अंकुशजी रामगडे यांनी केले. या प्रसंगी राळेगांव तालुक्यातील गो-प्रेमी व निमगव्हाणातील सरपंच, पोलीस पाटील, नागरीक माता भगिनी मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्र संचलन गो-शाळेचे सदस्य आशिष रामगडे यांनी केले.
