धानोरा गावामध्ये घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतला पडला साफसफाईचा विसर


उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, उमरखेड (ग्रामीण )


उमरखेड: तालुक्यातील धानोरा गावामध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. मान्सूनपूर्वी करण्याची साफसफाई अद्यापही केलेली नाही. आज रोजी 10 जून असून ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारचे नालेसफाई व गावातील साफसफाई केलेली.नाही. त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये सेफ्टीच्या आळ्या जात असल्याचे तक्रार नागरिक करत आहेत. आणि एखादा मोठा पाऊस झाल्यानंतर नालितील पाणी काही ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा जाण्याची सुद्धा शक्यता आहे.आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होईल त्यामुळे ग्रामपंचायत ने लवकरात लवकर नालेसफाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे मागील सत्ताधारी लोकांनी गावातील विकास केला नसल्याचे बोलले जात होते पण आता असे बोलले जात आहे सत्तेत आल्यानंतर सर्वजण सारखेच असतात फक्त निवडणुका जिंकण्या पुरते लोकांना खोटे आश्वासने दिली जात आहेत आणि गावाचा कोणता तरी विकास होईल या उद्देशाने गावकऱ्यांनी सत्ता बदल केला होता पण नागरिकांच्या समस्या जैसे ते वैसे आहेत यामुळे जनतेमधून नाराजी सोडून टाकत आहे