
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पांढरकवडा: स्थानिक भैय्यूजी महाराज बी.एड. (महिला) कॉलेज,पांढरकवडा येथे २६ जानेवारी रोजी मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने अक्षरधारा भिंतीपत्रकाचे मोठ्या थाटामाटात विमोचन झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक श्याम अरके सर, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.शेखर खिस्ती सर उपस्थित होते. महाविद्यालयाचे संचालक श्याम अरके सर यांच्या हस्ते भिंतीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थींनी प्रजासत्ताक दिनानिमित्य आढावा विविध लेख व कवितेच्या माध्यमातून घेतला. सदर भिंतीपत्रकामध्ये कु. अक्षता गराड ,कु. साक्षी बेले, कु. चेतना काटे,कु. स्नेहल गुल्हाने, कु. मोनाली डोमाडे, कु. कीर्तिका मडावी, कु. तन्वी खुपाट, कु. नसरीन अय्युब शेख इ.प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. सातव्या “अक्षरधारा ” भिंतीपत्रकाचे संपादन कु. प्रीती दादाराव रोडे यांनी केले. संपादकीय लेखातून कु. प्रीती रोडे यांनी ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे महत्व व हा केवळ उत्सव आत्मपरीक्षणाचा दिवस आहे असे पटवून सांगितले. अक्षरधारा भिंती पत्रकाच्या माध्यमातून गणराज्य दिनानिमित्य गणराज्य दिनाची महती विविध लेख आणि कवितेच्या माध्यमातून सांगण्यात आली. सदर भिंतीपत्रकासाठी प्रा. डॉ. सारिका निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ.अंशू साहू, डॉ. सुजया बीजवे, डॉ.सारिका निकम,प्रा.बालाजी राठोड,प्रा.राहुल पाईकराव,प्रा.पंकज आगलावे, प्रा. निलमणी मनवर, ,प्रा. जप्पिंदरकौर कानसे,प्रा. जान्हवी भोयर, प्रा. सुषमा ठाकरे (राऊत ) व समस्त शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.
