
वरोरा (प्रती ) वरोरा शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगदी पुतळ्या लगत फळा – फुलांची तसेच इतर ही छोटी -मोठी दुकाने थाटलेली असतात त्यामुळे पुतळ्याच्या परिसराचे विद्रुपीकरण होत आहे.याशिवाय अतिक्रमणामुळे इतर उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांना त्रास होत असून ही दुकाने त्वरित हटविण्यात यावी या मागणीचे निवेदन सामाजिक कार्येकर्ते अमर गोंडाने यांनी वरोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना गुरुवार दिनांक २५ मे रोजी निवेदन दिले.
या आधी सुद्धा बऱ्याच वेळा नगरपरिषद वरोरा यांना विविध संघटना तर्फे निवेदन देण्यात आले होते परंतु न. प ने आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई केली नाही किंबहुना न. प प्रशासनाने कोणतीही दखल न घेता इतक्या गंभीर प्रकरणात कानाडोळा केल्याचा आरोप समाजिक कार्यकर्ता अमर गोंडाने यांनी केला.
यावर त्वरित कारवाई व्हावी याकरिता त्यांनी ज्येष्ठ सामजिक कर्यार्त्यासोबत शिष्टमंडळ घेऊन मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा यांची भेट घेऊन, लवकरात लवकर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालगत व परिसरात असलेली दुकाने त्वरित हटवावी ऑटो थांब्यावर बंदी घालावी, सौंदर्यकरणासाठी मंजूर झालेला 19 लाखाचा निधी वापरून पुतळ्याचे सौंदर्यीकरण केले जावे. तसे न झाल्यास आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन छेडले जाईल असा इशारा अमर गोंडाने यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदनातून दिला.
यावेळी आंबेडकरी अनुयायी श्री जगदीश माळके सर , श्री संजयजी मेश्राम सर , श्री तेलंग सर , श्री दिलीपजि धनविग, श्री बापूराव रामटेके , श्री दत्तत्रय वानखडे सर तसेच इतर कार्यकर्ते शिष्टमंडळात सहभागी होते
