
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
स्थानिक शासकीय विश्राम भवन कँम्प येथे ट्रायबल फोरम अमरावती जिल्ह्याची सभा मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झाली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोद घोडाम होते.
या सभेत ट्रायबल फोरम अमरावती जिल्हाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, महासचिवपदी गंगाराम जांबेकर यांची तर ट्रायबल वुमेन्स फोरम जिल्हाध्यक्ष पदी अँड.लता गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली. अमरावती विभागातून राज्य कार्यकारिणीवर सेवानिवृत्त विभागीय उपायुक्त रमेशराव मावस्कर यांची राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा सचिव म्हणून शशिकांत आत्राम, प्रा.सुनील मावस्कर,जिल्हा कार्याध्यक्ष नरेश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अजयभाऊ उईके, जिल्हा संघटक संभाजी कुमरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरज सलाडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुभाष सिडाम, महेंद्र भिडेकर यांची नियुक्ती करुन नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी अमरावती विभागाचे विभागीय महासचिव प्रकाश चव्हाण ( उदईकार ) नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष राजू मडावी,नागपूर विभाग उपाध्यक्ष मनोहर पंधरे,वर्धा जिल्हाध्यक्ष वसंत मसराम, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मडावी,जिल्हा संघटक ओंकार मडावी,वर्धा तालुकाध्यक्ष राजू जुगनाके, विरांगणा राणी दुर्गावती स्मारक समिती कॅम्प अमरावती अध्यक्ष महानंदाताई टेकाम राजेश्वर गेडाम,नामदेव पंधरे, दिलीप कुमरे, सुरेश धुर्वे, राजेश उईके, सुमित कुमरे,मनोहर कोकाटे, वैभव मडकाम,प्रफुल उईके, संजय गजाम,निवृत्ती टेकाम,आतिश उईके,उमेश टेकाम,रामदास भलावी, अक्षय गजाम,सुरेखा उईके, शकुंतला मरसकोल्हे, अर्चना धुर्वे, लिला भलावी,सरस्वती भलावी,मंगला सयाम, अनिता खंडाते, प्रतीक्षा उईके, सुरेखा पेंदाम, अजय दाभेराव ज्ञानेश्वर उईके,परमेश्वर आत्राम, प्रशांत जुगनाके,देव धुर्वे,अमोल उईके,राजेश गेडाम, चेतन टेकाम,हर्ष खंडाते,सुरज खंडाते,नवलसिंग कासदेकर,पवन चांदेकर,के. एम.दुर्याम, मिरू उईके, नितीन नामूर्ते,मयूर वाडीवे यांच्यासह बैठकीला मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.
