
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक ३१ ऑक्टोंबर रोजी श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध विभागाचे नूतणीकरण आणि अद्यवत् नवीन रुग्ण सुविधांचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय ना. श्री. संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून पालकमंत्री आमदार श्री.संजय राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ विधानसभेचे आमदार श्री. अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर, वणी विधानसभेचे आमदार श्री.संजय देरकर ,जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी डॉ.मंदार पदकी हे होते.
हे कामे जिल्हा खनिज प्रतिष्ठान व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली. यामध्ये
क्ष किरणशास्त्र विभागात २२८ स्लाइस अत्याधुनिक सि.टी.स्कॅन मशीन चे लोकार्पण करण्यात आले, ज्याची रुग्णांच्या रोगनिदानात महत्त्वाची भूमिका आहे . तसेच प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले बालरोगचिकित्साशास्त्र विभागातील SNCU (स्पेशल न्यूआंनेटॉल केअर युनिट) याचे उद्घाटन करण्यात आले. SNCU मध्ये एका वेळेस ४६ नवजात शिशूंची देखभाल करता येऊ शकते. यामुळे बालरोगचिकित्साशास्त्र विभागाला नवजात बाळांचे आरोग्य सेवेमध्ये वृद्धी करण्यात मदत मिळणार आहे. तसेच शल्यक्रियाशास्त्र विभागाचे नूतनीकरण करून ऑपरेशन झालेल्या रुग्ण, गंभीर दुखापत झालेले रुग्ण यासाठी अत्याधुनिक SICU (सर्जिकल इंटेंसिव केअर युनिट) तयार करण्यात आले. यामध्ये आधुनिक मॉनिटरिंग सिस्टम, लाईफ सपोर्ट यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या, तसेच स्त्रीरोग शास्त्र विभागाच्या ४ ऑपरेशन थेटर चे उद्घाटन करण्यात आले. आता पर्यंत उपलब्ध नसलेली वांधत्य इंफर्टिलिटी आणि इंसेमिनेशन सुविधा उपलब्ध केल्यामुळे रुग्णांच्या उपचारात फार मोठी मदत मिळणार आहे. तसेच क्षयरोग व श्वशनशास्त्र विभागात (टी.बी अँड चेस्ट)अत्याधुनिक IRCU(मॉड्युलर इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिट ) नव्याने तयार करण्यात आले. यामुळे निमोनिया, टी.बी सारख्या आजाराच्या रुग्णांनावर उपचारासाठी मदत होणार आहे.
त्या सोबतच इतर ३ जनरल वॉर्ड चे नूतनीकरण करून त्याचेही उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा, अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ.रवींद्र राठोड़, डॉ.रोहिदास चव्हाण, डॉ.बाबा येलके, डॉ. आनंद आशिया, डॉ. पाशु शेख, प्रशासकीय अधिकारी श्री.संतोष झिंजे, डॉ. दुर्गेश देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद कुळमेथे, अधिपरिचारिका माया मोरे, यांचे सह
स्त्रीरोगशास्त्र विभागाचे डॉ. क्षमा केदार,डॉ.अतुल पद्मावार,डॉ.किरण धुर्वे , डॉ.विवेक मेश्राम, बालरोगचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ.अजय केशवाणी, डॉ.विशाल चव्हाण,डॉ.स्वप्नील काजळे, शल्यक्रियाशास्त्र विभागाचे डॉ. विजय पोटे ,डॉ. अमोल देशपांडे ,डॉ. विनोद राठोड ,डॉ. स्वप्नील मदनकर, राम ठोंगळे, क्ष किरणशास्त्र विभागाचे डॉ. अरुणा पवार अलोणे, डॉ. स्वप्निल सुने, डॉ. ऋषभ बोरा, क्षयरोग व श्वसनशास्त्र विभागाचे डॉ.संजय मुत्येपोड ,डॉ. जुही कडूकार, डॉ. योगेश आंबीलकर, डॉ. भाग्यश्री बर्वे व बीव्हीजी चे कर्मचारी तसेच नर्सेस विद्यार्थी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
