छात्रभारती पुणे जिल्हा आयोजित. व्यक्तिमत्त्व विकास शिबिर पुणे..

दिनांक १३ ते १५ सप्टेंबर २०२२.

पुणे जिल्हा आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे उद्घाटक ज्येष्ठ इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष छात्रभारतीचे कार्याध्यक्ष समाधान बागुल आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल पडवळ, उद्योजक किरण शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. शिबिराच्या प्रथम दिवशी प्रथम सत्रात भारतीय संविधान आणि आजचा युवा ह्या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले, तसेच द्वितीय सत्रात छात्रभारती समजून घेतांना या विषयावर छात्रभारतीचे माजी राज्याध्यक्ष प्रा.रविंद्र मेढे सर यांनी मार्गदर्शन केले आणि तृतीय सत्रात युवकांचे सामाजिक भान, स्त्रियांवरील वाढते अत्याचार, माझ्या स्वप्नातला जोडीदार, लिंग समभाव, सोशल मीडियाने समाजाचे पालटलेले चित्र या विषयांवर गटचर्चा घेण्यात आली या माध्यमातून सर्व शिबिरार्थींनी गटचर्चेत सहभाग घेऊन आपली भूमिका मांडली. अशा पध्दतीने पुणे जिल्हा व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचा प्रथम दिवस पार पडला आहे.