
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव शासनाच्या मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेच्या नियंत्रक तालुका म्हणून अशासकीय सदस्यपदी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख मनोजभाऊ भोयर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. ही योजना राबवत असताना महिलांना येणाऱ्या अडचणी, त्या वरील उपाय शोधणे, योजनेच्या लाभार्थ्यांचा आढावा घेणे, सेतूधारकांनकडून महिलांची होणारी आर्थिक फसवणूक, अश्या महिलांच्या तक्रारी शासनापर्यत पोहोचवणे. एकंदरीत या योजनेवर तालूका नियंत्रक म्हणून या योजनेच्या अशासकीय सदस्यपदी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख मनोजभाऊ भोयर यांची नियुक्त करण्यात आली आहे. मनोजभाऊ भोयर हे शिवसेनेच्या माध्यमातून तालुकाभर सर्वपरीचित आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी, प्रश्न सोडवण्याचा त्यांचा अभ्यास दांडगा असल्याने त्यांच्या या नियुक्तीचा तालुक्याला नक्कीच फायदा होणारआहे. प्रशासन आणि लेक लाडकी योजनेच्या लाभाथी महिला यांच्यातील समन्वय साधण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे.
