
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पवनार येथील गेल्या तीन दिवसांपासून भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या सिमला नो सिग्नल मिळत असल्याने पवनार येथील ग्राहकांकडून चांगलाच रोष व्यक्त होऊ लागला आहे
पवनार बस स्थानक परिसरातील सेवाग्राम रोड जवळ बीएसएनएल कंपनीचे टॉवर गेल्या अनेक वर्षांपासून उभे आहे असून टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज दर वाढीचा चांगलाच सपाटा लावल्याने सामान्यांच्या खिष्याला कात्री लागत आहे त्या मुळे ग्रामीण भागासह शहरी भागातही भारत संचार निगम लिमिटेड कडे नागरिक धाव घेत पवनार गावात नागरिकांनी काही प्रमाणात आपल्या पैशाची बचत होईल या करीता हजारोच्या वर नागरिकांनी बीएसएनएलचे सिम घेतले मात्र ग्रामीण भाग पडत असल्याने भारत संचार निगम लिमिटेड या कडे दुर्लक्ष करत आहे या करीता ग्रामस्थांनी कंपनीकडे वारंवार लेखी व ऑनलाइन तक्रारी नोंदवल्या तरी सुधा बीएसएनएल कंपनी या कडे डोळे झाक करत आहे त्या मुळे नागरिकांनी केलेल्या रीचार्जचे पैसे वाया जात आहे व नागरिकांनी या मुळे चांगलाच मनस्ताप सहन करावं लागत आहे वारंवार नो सिग्नल मिळत असून नेटहि चालत नाही परिणामी भारत संचार निगम लिमिटेड वर नागरिक चांगलेच संताप व्यक्त करत आहे.
पवनार इथे भारत संचार निगम लिमिटेडचे टावर कंपनी कडून उभारण्यात आले मात्र केवळ इलेक्ट्रिकच्या भरोष्यावर सद्या हा टावर चालत आहे लाईट लाईट जाताच पर्याई सुविधा नसल्याने नेटवर्क गायब होत असल्याने ग्राहकांचे सिम बंद पडत आहे त्या मुळे अर्जंट फोन करायचा असल्यास फोनच लागत नाही वारंवार कंपनीस तक्रार करून सुधा भारत संचार निगम कंपनी या कडे लक्ष देत नसल्याची ओरड आता नागरिक करू लागले आहे.
टावर उभे मात्र नो सिंगल मिळत असल्याने पवनार ग्रामवसियानमद्ये असंतोषाची लाट
टेलिकॉम कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात दर वाढ केल्याने सर्व सामान्य माणूस पुरता हादरला आहे आधीच महागाईच्या विळ ख्याने सर्व सामान्य माणूस होरपळत असताना सर्वच कंपन्यांनी रिचार्ज दर वाढीचा सपाटा लावला त्या मुळे एकीकडे सर्व सामान्यांचे बजेट कोलमडले अस्टल्याने बीएसएनएल कार्ड नागरिकांनी धाव घेतली मात्र इथेही निराशाच मिळत असल्याने बीएसएनएलचे सिम बंद करून नागरिकांनी परत जिओ किंवा एअरटेल कपंनीचे सिम घ्यावे का असा प्रश्न सद्या उपस्थित होऊ लागला आहे.त्या मुळे भारत संचार निगम लिमिटेड BSNL सिम घेवून आपली फसगत झाल्याचे आता नागरिक बोलू लागले आहे पवनार इथे भारत संचार निगम लिमिटेड चे टॉवर गेल्या अनेक वर्षांपासून उभे आहे मात्र लाईट जाताच नेटवर्क गायब होऊन सिम बंद पडत आहे यामुळे कॉल येणे किंवा कॉल जाणे बंद होत असल्याने आता BSNL सिम घेतलेल्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे गेल्या तीन दिवसापासून पासून पवनार परिसरात बीएसएनएलचे नो नेटवर्क दाखवत असल्याने कॉल कसा करावा असा प्रश्न बीएसएनएल धारकांना पडला आहे त्यातच नेटही मिळत नसल्याने नागरिकांची मोठी पंचायत निर्माण झाली आहे
त्यामुळे भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने या कडे तत्काळ लक्ष देवून व्यवस्था सुरळीत करण्यात यावी अशी मागणी आता पवनार ग्रामवसियांकदडून जोर धरू लागली असून लाईट जाताच नेतवरक गायब होत असल्याने कंपनीने तत्काळ पर्यायी व्यवस्था करावी नाहीतर भारत संचार निगम लिमिटेड चे सिम कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकल्या शिवाय आमचे कडे दुसरा पर्याय नाही त्या मुळे कंपनीने या कडे तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
