
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव: वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत नवरात्री उत्सव दसरा उत्सव धम्म चक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पाडण्याचे उद्देशाने वडकी गावांमध्ये दि २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सोमवारला सकाळी १०.३० ते११.३० वा या वेळात सदर रुट मार्च गावातील वस्ती मध्ये, मार्केट लाईन, आठवडी बाजार, मोठा बोगदा, मेन रोड या मार्गावर रुट मार्च काढण्यात आला, सदर रुट मार्च मध्ये, पोलिस निरीक्षक, उप पोलिस निरीक्षक, १८ पोलिस अंमलदार, २१ होमगार्ड असे ४१ मनुष्यबळ सहभागी होते.
