
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रशक्ती फिल्म
मुंबई-ची विशेष सभा घेण्यात आली या सभेत मुंबईचे राष्ट्रिय
अध्यक्ष रवी भोंगाडे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष ठराव घेण्यात आले नुकतीच राष्ट्रशक्ती फिल्म मुंबई ची 5 दिवसीय राज्यस्तरिय चित्रपट अभिनय कार्यशाळा दिनांक 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट रोजी संपन्न झाली-कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश अगरवाल दिग्दर्शक अभिनेते यांनी विशेष मार्गदर्शन केले तर प्रमुख पाहुणे म्हणून उमेश भाऊ मेश्राम यांनी कला ही माणसाच्या जीवनाला विशेष अलंकृत करते असे विचार मांडले समारोपिय कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष पदावरून बोलताना ” कलावंता च्या जिवनात राष्ट्रशक्ती फिल्म मुंबईने संघर्षाची खरी मशाल पेटविली” असे महान विचार विदर्भ अन्याय निवारण समिती च्या अध्यक्षा क्रांती ताई धोटे यांनी मांडले या कार्यशाळेत मुंबई चे सिने दिग्दर्शक दिलीप घेवंदे सर
सिने दिग्दर्शक अतुल कुडवे सर ,डॉ. प्रफुल आगावने सर मुंबई यांचे विशेष कलात्मक प्रशिक्षण पर मार्गदर्शन लाभले . याच प्रशिक्षणातुन कलाकारांची योग्य निवड झाल्याचे मनोगत
प्रख्यात साहित्यिक आकांत कार बाबारावजी मडावी यांनी व्यक्त केले या कार्यशाळेला अभिनेत्री संतोषी चव्हाण मुंबई, गीतकार राजू काळे मुंबई, नागपूर येथील प्रेरणा मॅगझिन च्या
कोमल तायडे
( पब्लिकेशन मॅनेजर )
आणि संपादिका सुहासिनी तायडे
( प्रेरणा मॅगझीन
नागपूर ) या उपस्थित होत्या . मुख्य अतिथी म्हणून डॉ.सतीश कोडापे यवतमाळ, काशीनाथ गजभीये नौशाद खान , सीमा खान यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यशाळेत अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . त्या मध्ये प्रामुख्याने यवतमाळ मधील ज्यांचे एक भीमगीत इंस्टाग्राम वर तुफान वायरल होऊन त्यांचे 2 मिलियन लोकांनी बघितले म्हणून दुर्गाबाई मेश्राम यांचा अभिनेत्री संतोषी चव्हान,अभिनेत्री सोनू नगराळे,राष्ट्रशक्ती फिल्म चे रवी भोंगाडे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . या कार्यशाळेचा उद्देश मांडताना विदर्भात चित्रपट सृष्टी निर्माण करण्याचे मत रवी भोंगाडे यांनी विषद केले .अभिनेत्री सोनू नगराळे यांनी आपले विचार मांडताना आई वडिलांनी आपल्या मुला मुलींना कलेच्या क्षेत्रात उंच भरारी घेण्यास मदत करावी त्यांना अडथळा आणू नये असे मत व्यक्त केले .या 5 दिवस चाललेल्या कार्यशाळेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला
या अभिनय शिबिरामध्ये विशेष सहकार्य
प्रेरणा मॅगझिन आणि अतुल कुडवे एंटरटेनमेंट यांनी केले.
या कार्यशाळेला अनेकांचे सहकार्य लाभले . श्री.प्रकाश डब्बावार ,सुजित बोरटकर,भगवान भारसाकळे,मुंबई चे रिटायर्ड पोलिस अधिकारी शामराव पवार .रेणुका बरडे, करुणा शिरसाठ ,चंदा खडसे ,
धर्मपाल माने ,तनुजा वाकोडे , रेवती रोकडे, अलका मसराम,माही मसराम , भलके सर,असे अनेक कलाकार व मान्यवर उपस्थित होते . संचालन सुमती ताई खंडारे यांनी केले तर आभार प्रकाश डब्बावार सरानी मांडले .
