
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अंतरगाव -गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे माझी शाळा सुंदर शाळा कार्यक्रमा अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, डॉ श्रीकांत बहाड, डॉ तृप्ति डुकरे व सौ सविता सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते,सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यात ज्या विद्यार्थ्यांना दुर्धर आजार असेल, अश्या विद्यार्थ्यांना पुढे तपासणी साठी पाठविण्याचे ठरले..
या उपक्रमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ झाला, कार्यक्रमासाठी प्राचार्य राजेश शर्मा व सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
