
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड
हिमायतनगर परिसरातील गेल्या तीन दिवसापासून अचानक पणे जोरदार पाऊस पडत असल्यामुळे आता तोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक वाया जाते की काय अशी भीती ?परिसरातील शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. काही भागातील सोयाबीन काढणीला आले होते तर काही भागातील सोयाबीनची कापणी चालू होती तेव्हा मागील तीन दिवसापासून पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेतातील काही भागातील सोयाबीन काढणीला आले होते ,तर काही भागातील सोयाबीनची कापणी चालू होती तेव्हा मागील तीन दिवसापासून पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ झाली, आहे. शेतातील तोंडाशी आलेले सोयाबीन पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्याचे धडपड सुरू असून अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसाच्या तडाख्यात सापडली आहे गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहे, यावर्षी पावसाने शेतकऱ्याची चेष्टा केली असल्याने बोलले जात आहे. पाऊस अजून मधून उघडझाब करीत असून नको त्यावेळी पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील कापणीसाठी आलेले शेतातील सोयाबीनची पिके पावसाच्या तडाख्यात सापडली आहेत. शेतकरी त्या पिकांना वाचवण्यासाठी धडपड करीत आहे या सोयाबीनच्या पेरणीसाठी तीन हजार रुपये किंमत आणि मजुरी मोजावी लागली असून त्यामध्ये निसर्गाचा असा कोप हा नियतीचा खेळ आहे का अजून काय अशी निराशा जनक शेतकरी बोलत आहेत या तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी सर्व बाजूने आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीन पिकलं आणि बाजारात विक्रीसाठी आणलं तर त्या मालाला आमच्या बाजारपेठेत कवडीमोल भावाने विकावे लागते.
