गोदावरी अर्बन बँकेच्या शाखा ढाणकीतर्फे बिटरगाव (ढाणकी )पोलीस स्टेशनला 10 ट्रॅफिक बॅरिकेट्स व 20 ट्री गार्ड भेट


ढाणकी( प्रतिनिधी) प्रवीण जोशी


सामाजिक कामात सतत आपला सहभाग असणारी बँक म्हणून गोदावरी अर्बन ची ओळख आहे. मग रक्तदान शिबिर असो किंवा कशाही प्रकारची आपत्ती असो गोदावरी अर्बनने नेहमीच आपली समाजाप्रती दायित्व पार पाडले आहे. याला अनुसरूनच गोदावरी अर्बन चे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर व दवे मॅडम यांच्या संकल्पनेतून दिनांक 29 तारखेला गोदावरी अर्बन शाखा ढाणकी यांचे तर्फे बिटरगाव पोलीस स्टेशनला 10 ट्रॅफिक बॅरिकेट्स व 20 ट्रिगार्ड भेट देण्यात आली यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापजी भोस, सुभाष कुचेरिया, नागोराव मिटकरे, गजानन जिल्हावार, सचिन साखरे, अमोल तुपेकर, संजय भोसले, उदय पुंडे, सौ आशा कलाने, इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते व कर्मचारी वृंद म्हणून शाखा व्यवस्थापक मुकुल पांडे, संतोष निरगुडे, श्रीनिवास पाध्ये, अभिजीत मिडेपिल्लेवार ,संकेत साखरे, सौ मनीषा देशमुख, ज्ञानेश्वर नाईकवाडे, संदेश गायकवाड, इत्यादी कर्मचारी वृंदांची उपस्थिती होती.