
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावराची वाहतूक होत असल्याचे गोपनीय माहितीच्या आधारे बुधवार दि २८ रात्री सुमारे दोन वाजता दरम्यान सापळा रचून वाहन पकडले.या वाहनाची तपासणी केली असता अतिशय निर्दयपणे कोंबून असलेले गोवंश जातीचे जनावरे आढळून आले. वाहन ताब्यात घेऊन एकूण ३८ बैलासह ४३लाख ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४वर नागपूर कडून आंध्र प्रदेशात अतिशय क्रूरतेने जनावराची वाहतूक होत असल्याची माहित वडकी पोलिसांना मिळाली .
त्यावरून या महामार्गावर दहेगाव फाट्याजवळ सापळा रचून तपासणी केली असता यू पी २१ डी टी ८७५४ या क्रमांकाच्या वाहनात गोवंश जातीच्या बैल जनावरे विना चारपाणी शिवाय कोंबून ठेवलेले आढळून आले या वाहनातून बैलांची सुटका करण्यात आली असून चालक वाहन सोडून फरार झाले अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी गोवंश जातीचे जनावरे व वाहन जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी ठाणेदार सुखदेव भोरखडे, सचिन नेवारे, भोजराज करपते, अरविंद चव्हाण, आकाश कदुसे, विनोद मोतेराव, चालक दीपक मडकाम यांनी केली.
