
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सावनेर येथिल पौर्णिमा माध्यमिक विद्यालयात देशाचा स्वतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मा.श्री. बाळासाहेबजी मानकर होते तर प्रमुख म्हणून पाहुणे मा.श्री.प्रतापराव मानकर तसेच गावातील सरपंच सौ.अमिता खोब्रागडे मॅडम,उपसरपंच श्री.रमेशजी राऊत, श्री.अरविंदजी तोडासे काका,पो.पाटील श्री.राजुभाऊ बुंचुंदे, श्री.प्रदिपजी शेळके(मुख्याध्यापक जि. प.शाळा सावनेर). ध्वजारोहण मा.श्री. बाळासाहेबजी मानकर याच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रास्ताविकपर भाषण शाळेचे मु्ख्याध्यापक श्री. दयालाल भोयर सर यांनी केले.विशेष भूषण म्हणून शाळेचा माजी विद्यार्थी सुशील अब्बास राऊत यांची भारतीय सैनिकांमध्ये निवड झाल्याबद्दल सरपंच सौ.खोब्रागडे मॅडम व इतर प्रतिष्ठित मंडळी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर सुशिलने आपल्या भाषणातून देशसेवा विषयी मनोगत व्यक्त केले.तसेच शाळेतील अनेक मुलांनी भाषणात सहभाग घेऊन स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील कर्मचारी श्री.गजानन टाले,कु.धनश्री दिघडे मॅडम,श्री.अनिल भोयर, कु.स्वाती उघडे मॅडम, श्री. प्रफुल्ल कुमरे, श्री.राजेश्वर शिंदे, श्री. त्रिवेंद्र बरडे, श्री.संजयकुमार शेलोटे, श्री. सतिश बोरकर, श्री.चंदू कपाट, श्री. प्रविण खैरे यांनी मोलाची कामगिरी बजावली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मोहन तेलंग सर तर आभार प्रदर्शन श्री.धवल घुंगरूड सर यांनी केले.
