ढाणकी शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांचे पथसंंचलन


प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ


शहरात होणाऱ्या गणपती आणि इतर येणाऱ्या सणांमध्ये कुठल्याही प्रकारे जातीय तेढ निर्माण होणार नाही यासाठी बिटरगाव(बू) पोलीस प्रशासनाकडून ढाणकी शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी दि १८ सप्टेंबर रोजी रूट मार्च(पथसं चलन व रंगीत तालीम) काढून शहरातील जनतेला व नागरीकांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गणेशचतुर्थी आणि येणाऱ्या इतर सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यवतमाळ व उमरखेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १८ सप्टेंबर बिटरगाव(बू) पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सुजाता बन्सोड यांचे उपस्थितीत आज शहरातील मुख्य मिरवणूक रस्त्याने रूट मार्च काढून शहरातील नागरिकांना धार्मिक सण व उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून नागरिकांनी शांततेत सण साजरे करण्याचे आवाहन शहरातील नागरिकांना केले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता बन्सोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टीपूरने याचेसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.