
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव : तालुक्यातील सावरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिक तुळशीरामजी दुधकोहळे यांचे अल्पशा आजाराने 6 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले ते 61 वर्षाचे होते.
त्यांनी 12 वर्ष भारतीय सैन्यात सेवा दिली,त्यांच्या सेवा काळात त्यांनी सर्व भारत भर भ्रमण केलं त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवाची मोठी शिदोरी होती,लष्करी सेवेत भरती होणारे ते गावातील पहिलेच व्यक्ती,त्यांनी भारतीय सैन्यात तोफखाणाचालक पदी सेवा दिली. आसाम-बंगाल क्षेत्रात कार्यरत असतांना,त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी साठी त्यांना ‘आसाम-बंगाल’ या पदकाने सन्मानित करण्यात आले,त्यांनी त्या नंतर सुद्धा सामाजिक सेवेत महत्वाचे योगदान दिले,गावातील एखादी सूचना,सामाजिक कार्यक्रम इत्यादी बाबीची माहिती सावरखेडकराना त्यांच्या बुलंद आवाजात नेमचीच ऐकायला येत,त्यांना ग्रामगीतेचा गाढा अभ्यास होता,त्यांनी आपल्या आयुष्याची बरीच वर्षे ग्रामगीतेच्या प्रचार्थ खर्च केली, ग्रामगीतेच्या ज्ञानातून सामाजिक जीवन अधिक जागृत करता येते,सामाजिक जागृता निर्माण झाली की समाजाचा विकास जलद घडून येतो असा त्यांचा ठाम विश्वास होता,सामाजिक संदेश देणाऱ्या अनेक ओव्या,भजने त्यांनी कंठस्थ केल्या होत्या,त्यांनी ग्रामगीतेचा अनेक गावांत प्रचार व प्रसार केला,ग्रामगीता ही गाव विकासाची गुरुकिल्ली आहे असे ते नेहमी म्हणत,ग्रामस्वच्छते मध्ये त्यांच्या अग्रणी सहभाग असायचा.कोविड काळात त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी साठी गावातून निधी गोळा केला होता.
त्यांनी ‘वेगळा विदर्भ ‘ या चळवळीत भाऊ जामवंत धोटे यांच्या समवेत पदयात्रा केली, या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला,त्यांचा सामाजिक तसेच राजकीय कार्यात सक्रिय सहभाग होता,देश सेवा,देशभक्ती, समाजसेवा इत्यादी गुण त्यांच्या मध्ये ठळक पणे दिसून येते,सामाजिक कार्यात त्यांचा असलेला सक्रिय सहभाग त्यांचे सामाजिक महत्व अधोरेखित करते,त्यांच्या अकाली निघून जाण्याने समाज जीवनात पोकळी निर्माण झाली,त्यांच्या पश्चात आप्त परिवार आहे.
