प्राथमिक आरोग्य केंद्र वाढोणाबाजार येथे संविधान दिन साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वाढोणाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला.त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉ गोपाल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे डॉ सुरज मोरे, डॉ खान, आरोग्य खात्याचे अरविंद केराम, उपस्थित होते.अरविंद केराम यांनी संविधानाबाबत सविस्तर माहिती दिली.आरोग्य खात्याच्या शारदा तुपकर यांनी संविधानावर आधारित गीत सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोदा आडे यांनी केले.तर आभार प्रदर्शन आरोग्य खात्याच्या कर्मचारी यांनी मानले.या कार्यक्रमाला आरोग्य खात्यांचे शिवदास कोवे, राजूरकर साहेब यांच्या सह आरोग्य कर्मचारी, आशा स्वंयमसेविका, आरोग्य सेविका उपस्थित होत्या.