राळेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकतर्फी विजय


राळेगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पाच उमेदवार अविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित दहा उमेदवारासाठी दिनांक 5/3/2023 ला मतदान पार पडले त्यामध्ये दहाही उमेदवार प्रचंड फरकाने बहुमतात निवडून आले. या निवडणुकीत सर्वप्रथम पंकज गावंडे, अशोक काचोळे, अभिजित मानकर, सचिन टोंग, विनोद भोकटे हे अविरोध निवडून आले तर उर्वरित उमेदवार पाच तारखेला पार पडलेल्या निवडणुकीत मिलिंद इंगोले, मारोती पाल,श्रवनसिंग वडते,पवन छोरीया,श्रीधर थुटुरकर,कवडू कांबळे, संदीप तेलंगे, दिनेश ठाकरे,सौ.राजश्री झोटींग,सौ.वर्षा बोरेकर, हे प्रचंड बहुमताने निवडून आले.ही निवडणूक यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर व काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्ल मानकर व यवतमाळ जिल्ह्यातील काॅंग्रेसचे नेते अरविंद वाढोणकर यांच्या नेतृत्वाखाली राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेंलगे, नगराध्यक्ष रविंद्र शेराम , उपनगराध्यक्ष जानराव गिरी, प्रदिप ठुणे, सह निवडणूक यशस्वी होण्यासाठी नंदकुमार गांधी, अंकुश रोहणकर,मनिष गांधी,दिपक देशमुख,राजू महाजन, अंकित कटारिया,राहूल होले, गजानन पाल, प्रफुल्ल तायवाडे,आशिष पारधी,अंनिल केवटे, सचिन हुरकुंडे,आशिष कोल्हे, अंकुश मुनेश्वर, पुरूषोत्तम चिडे, राजेंद्र ओंकार,अफसर अली, रविंद्र निवल, किशोर धामंदे, विनोद जयपूरकर,सुरेश पेंद्राम,सनी छोरीया, सुभाष भोयर, गोवर्धन वाघमारे,मधू राजूरकर सह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.या निवडणुकीत झालेल्या एकतर्फी विजयामुळे काॅंग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.