
वडकी येथे १ जुलै रोजी बुधवारला रात्री अचानक शॉर्ट सर्किट मुळे भारत हार्डवेअर दुकानाला आग लागली असून या लागलेल्या आगीत भारत हार्डवरमधील लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
भारत हार्डवेअर हे दुकान पोलीस स्टेशन लगत असून भारत हार्डवेअर दुकानाला शॉट सर्किट मुळे ही आग लागली असून लागली काही क्षणातच आगीने रुद्र रूप धारण केल्याने दुकानातील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाले भारत हार्डवेअर चे संचालक मयूर प्रल्हाद होरे हे नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून घरी गेले होते मात्र रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले पाहता पाहता दुकानातून तसतशी आगीचे धुळ मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ लागले या घटनेची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी घटना स्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला दुकानात हार्डवेअरचे मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने आग वेगाने पसरली असून दुकानातील माल जळून खाक झाला या आग विझवण्यासाठी अग्नीचे मन दलाला पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत आगीने मोठे नुकसान केले होते घटनास्थळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे ,मंडळ अधिकारी दिलीप चिडे, पोलीस कर्मचारी दीपक वांड्रसवार, विलास मोतीराव, यांच्यासह माजी सरपंच दिलीप कडू ग्रामपंचायत सदस्य शरद सराटे, लियाजखा पठाण, हेमंत वाबिटकर, गणेश गौरकार,अमित उताणे , परिक्षित फुटाणे परीक्षेत फुटाणे आदींनी मदत कार्य करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले या आगीत मयूर होरे यांच्या भारत हार्डवेअर दुकानातील साहित्य वस्तू इतर माल पूर्णपणे जाळून खाक झाला या लागलेल्या आगीत जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
