
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
‘तालुक्यातील असलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय असून या कार्यालयात दररोज दस्त नोंदणी खरेदी विक्री करारनामे,तडजोड पत्र ,प्लॉट खरेदी, शेती खरेदी केली जाते.याच कामासाठी नागरिक कार्यालयात खरेदी घेऊन आल्यानंतर येथील साहेब खरेदी पाहिल्यानंतर काही ना काही कारण दाखवात नागरिकांना वापस केले जात असल्याची ओरड नागरिकांकडून केली जाते नाहीतर साहेबाना टेबलाखालून दिले तर काम केले जाते त्यामुळे सरकारी काम चार महिने थांब नाहीतर टेबलाखालून द्या अन काम करून घ्या ही म्हण या कार्यालयात लागू होताना दिसत आहे . त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या कडून चिरीमिरी घेतल्याशिवाय काम केले जात नसल्याची ओरड येथे येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.
राळेगाव उपविभागाची निर्मिती जवळपास दहा वर्षांपूर्वी झाली आहे या उपविभागात कळंब आणि राळेगाव तालुक्याचा समावेश असून तालुक्यातील नागरिकांची कार्यालयीन कामे येथूनच केली जाते. परंतु साहेबच ठरल्या वेळेवर येत नसल्याने नागरिकांची कामे वेळेत कशी होणार त्यामुळे नागरिक कामासाठी तासनतास वाट पाहत बसत असतात त्यानंतरही साहेब आले की कागदपत्रे हाताळायला घेतले की डिजिटल सातबारा असून सुद्धा खरेदी नाकारने,किंवा पॅन कार्ड नसल्याने खरेदी नाकारणे, सातबारावर कॅनल दर्शविले असताना व शासकीय नियमानुसार दीडपट मुद्रांक भरल्यानंतर प्रमाणपत्रासाठी तगादा लावणे ,आदी या या ना त्या कागद पत्रांची अट पुढे करून कामे अडविले जात आहे. नाहीतर पुन्हा कागदपत्राची पूर्तता करावयास सांगितले जाते जर लक्ष्मीचे अस्त्र दिले की काम केले जाते अशी चर्चा या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.
त्यामुळे साहेबांचे खरेदी मागे पाचशे ते हजार रुपये ठरलेले असून ठराविक ‘व्यक्ती’ मार्फत घेतल्या जातात त्यानंतर ह्याच ठराविक व्यक्तीकडून आलेली कामं विनायास सातत्याने केली जात आहे?
या खरेदी खतांच्या माध्यमातून अधिकारी लाखोंची माया जमा करत असल्याची चर्चा सध्या येथे येणार्या नागरिकाकडून केली जात असून याकडे येथील असलेल्या वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष तर करीत नाही ना अशी चर्चा सध्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकाकडून केली जात आहे.
