
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कळंब:-कळंब तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या मारेगाव येथील जंगलालगत असलेल्या शिवारात येथील महिला शेतकरी सुमनबाई नारायण शिंदे वय वर्ष ५० रा. मारेगाव पोड ही शेतकरी नेहमी प्रमाणे आपली गुरे चारण्यासाठी गेले असता दिनांक १५डिसेंबर २०२५ रोजी सोमवारी ७वाजेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घालून वासराला ठार केले यामध्ये सदर शेतकऱ्यांचे २० हजाराचे नुकसान झाले आहे. सबंधीत शेतकरी महिला आरडा ओरड केली मात्र वाघाच्या भीतीपोटी वासराला वाघाच्या तावडीतुन सोडवणे शक्य झाले नाही.
या पुर्वीही मारेगाव पोड शिवारातील जंगलात वाघाच्या हल्यात अनेक शेळयासह कालवड व इतर जनावर ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत या विषयी संबंधित शेतकऱ्यांनी वनविभागाकडे माहिती दिली असून. या संदर्भात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी वनविभाकडे केली आहे याकडे संबंधित वनविभागाने गांभीर्याने लक्ष केंद्रित करून व या जंगल भागात सी सी टी व्हि कॅमेरे बसविण्यात यावेत आणि तात्काळ सततच मारेगाव पोड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे
