
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक २७जून २०२४ रोजी दिग्रस तालुका येथील तूपटाकळी या गावातील शिवारात शेतकरी संघटनेने आधुनिक तंत्रज्ञान जेनेटिक मॉडिफाइड सीड एच टी बी टी कापूस बियाण्याची लागवड करून सरकारला दिशा देण्याचे काम केले असून. या आंदोलनात देशातील कृषी प्रमुख शास्त्रज्ञ सीडी माई यांच्या एल्गारनंतर आंदोलन नाला सुरुवात केली असून देशामध्ये हे तंत्रज्ञान मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या कंपनीचे एच टी बी टी लागवड वाढवण्याच्या आव्हान केले असून, त्याला प्रतिसाद देण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी पुढाकार घेऊन हे आंदोलनाची धुरा सांभाळली. शेतकरी संघटनेचे आंदोलन दिल्लीच्या कमिटीकडे पोहोचण्याची आश्वासन माजी शेतकरी संघटना अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी दिल्लीत हा विषय पोहोचविण्याचे आश्वासित केले. शेतकरी संघटनेतर्फे संघटनेचे कृषी आणि तंत्रज्ञान प्रमुख मिलिंद दामले यांनी देशातील पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने जमीन, पाणी आणि फवारणीचे तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय उत्पादन खर्च कमी होणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त सरकार आणि शेतकरी संघटनानी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून तो खर्च कमी करण्याच्या दृष्टीने वेळ देण्याचे आव्हान केले असून , त्यासाठी त्यांनी दोन तासाचे कृषी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. तर विजय नीवल यांनी जास्तीत जास्त रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने आणि अर्धकुशल, कुशल रोजगार कृषी उत्पादन वाढवून त्यापासून निर्माण होणारे उपपदार्थ तयार करण्याचे कारखाने निर्माण करून, हा पुढील दहा कोटी रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीने जेनेटिक सीड लागवड करून ,देशात कृषीवर आधारित खाद्यपदार्थ ,इंधन उप पदार्थ उत्पादन वाढवण्याचे आव्हान केले असून. शेतकरी संघटनेचे माजी आमदार, ज्येष्ठ नेते, सेनापती वामनराव चटप यांनी कृषी तंत्रज्ञानाचा विषय आणि बाजारपेठेचा विषय हा राजकीय झाल्यामुळे राजकीय पद्धतीने याला समोर जावे लागेल अशी आश्वासित केले.ए टी बी टी लागवडीत विशेष योगदाना बद्दल कांन्ता राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
आंदोलनात परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित झाले असून प्रामुख्याने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग, देवेंद्र राऊत दीपक अण्णा आनंदवार चंद्रशेखर देशमुख हिम्मतराव देशमुख पंडितराव भेंडे डॉ विजय घाडगे, गजानन पारखी, अक्षय महाजन, गोपाल भोयर,अमोल जवादे,भास्कर पाटील, राहील पठाण, कृष्णराव भोंगाडे, मधुसूदन कोवे, महीला आघाडी अध्यक्षा सोनाली मरगडे, श्रीराम ठाकरे, सुभाषचंद्र अटल, योगीराज गावंडे, गणेश म्हात्रे, युवराज आडे, इंदल राठोड, विवेक देशमुख,राजु ठाकरे,व अनेक युवा शेतकऱ्याची मुले या आंदोलनात सहभागी झाली होती.यावेळी कृषी विभागासह पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता
