राळेगाव येथे “वेध ग्राम समृद्धी” अंतर्गत शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

     

राळेगाव “वेद ग्राम समृद्धी”अंतर्गत दि. ८-१२-२०२२ रोजी गुरुवार दुपारी १० ते ४ वाजता वसंत जिनिंग भाऊसाहेब कोल्हे सभागृह राळेगाव जि. यवतमाळ येथे “किफायतशीर पाण्याच्या वापरातून श्रीमंती, लखपती शेतकरी, एकात्मिक सेंद्रिय शेती व थेट विक्री व्यवस्थापन” या विषयावर अभिनव फार्मसी क्लब पुणे संस्थापक अध्यक्ष तथा नामवंत कृषीतज्ञ मा.श्री.ज्ञानेश्वर बोडके मु. माना बोडखेवाडी ता. मुळशी जी .पुणे यांचे विशाल मार्गदर्शनपर “वेद ग्राम समृद्धी शेतकऱ्यांची कार्यशाळा” शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित केली आहे.
आयोजित कार्यशाळेत इच्छुक पुरुष,महिला व युवक शेतकऱ्यांनी सहभागी होता येईल कार्यशाळेची प्रवेश सहभाग शुल्क ३५० रु.आहे ज्या इच्छुक पुरुष,महिला व युवक शेतकऱ्यांना कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी कार्यशाळेच्या व्यवस्थापनेच्या दृष्टीने दि.५-१२-२०२२ पर्यंत प्रवेश सहभाग शुल्क भरून नाव नोंदणी करून कार्यशाळेत सहभाग नोंदवावा लागेल.
अधिक माहितीसाठी-किशोर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते) एकलारा ९५११८१२३६७,गंगाधर घोटेकर (सामाजिक कार्यकर्ते) गुजरी ९६७३१४१६५७, मोहन नरडवार (सामाजिक कार्यकर्ते) तथा सरपंच ग.ग्रा.पं. वालदुर ७८८७८९७८९, कुणाल इंगोले (सामाजिक कार्यकर्ते)तथा उपसरपंच ग्रा.पं. पिंपरी ९६६५६५८५४५ यांच्याशी संपर्क करावा.
श्री.ज्ञानेश्वर बोडके यांचे संदर्भात अधिक माहिती You Tube वर मिळेल.