
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रुग्णालयात रुग्णाचे प्राण वाचवण्याकरिता अनेक आजारांवर शस्त्रक्रिया केली जाते, बहुतांश पोटाच्या विकाराचे, गाठींचे, हाडांचे महिलांच्या सिजेरियन सेक्शन, डोळ्यांचे, कान,नाक, घसा व इतरही आपत्कालीन व इमर्जन्सी ऑपरेशन महाविद्यालयात सातत्याने केले जातात.
हे सर्व ऑपरेशन (शस्त्रक्रिया) विशिष्ट आधुनिक शस्त्रानेच (इन्स्ट्रुमेंटने) केले जातात. या शस्त्रक्रियेतून बहुतांश रुग्ण हे बरे होतात व त्यांना नवीन एक जीवन मिळते. I treat but He cures अशी जी म्हण आहे, त्यामध्ये निसर्ग रूपी परमेश्वर आणि शस्त्राकडून मानवी जीवनात मिळालेल्या योगदानाची कृतघ्नता व भारतीय सांस्कृतिक परंपरा व आजच्या दिवसाचे महत्व दडलेले आहे. हे लक्षात घेता आज विजयादशमी निमित्त श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जनरल सर्जरी विभाग, अस्थिव्यंगपोचार विभाग, स्त्रीरोगशास्त्र विभाग ,नेत्र विभाग, कान नाक घसा विभाग इत्यादी विभागामार्फत आधुनिक सर्जिकल शस्त्रांचे पूजन महाविद्यालयाचे अधिष्ठाचा डॉ. अनिल बत्रा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेंद्र भुयार, जनरल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ.विजय पोटे , अस्थिव्यंग्यपोचार विभागाचे प्रमुख डॉ. जय राठोड, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमर सुरजुशे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद कुळमेथे, आधिसेवीका श्रीमती माया मोरे उपस्थित होते.
यावेळी जनरल सर्जरी विभागाचे अध्यापक डॉ. विनोद राठोड, डॉ. अमोल देशपांडे, डॉ.स्वप्नील मदनकर, डॉ.विशाल येलके, डॉ. राम ठोंगळे व अस्थिव्यंगोपचार विभागाचे अध्यापक डॉ. आशिष चव्हाण ,डॉ. जावेद सौदागर, डॉ. अनिकेत खरात, बधरिकरण विभागाचे डॉ. रोशन शेंडे ,डॉ.सचिन पद्मावार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदवीधर विद्यार्थी व ऑपरेशन थिएटर मधील नर्सेस व इतर कर्मचारी वर्ग या सर्वांनी आपले मोलाचे योगदान दिले.
