
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
कापसाच्या भावात होणाऱ्या चढ उतारीने व भाव वाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस विक्रीसाठी बाहेर काढलाच नाही. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा अद्यापही ८० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे.
गतवर्षी कापसाला १२ ते १३ हजार भाव मिळाल्याने शेतकरी यावर्षीही तेवढ्याच भावाची वाट पाहत होते मात्र सुरुवातीला नऊ ते साडेनऊ हजार भाव मिळाल्यानंतर सध्या कापूस आठ हजारावर विकला जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवायला जागाही उरली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरातच कापूस असल्याने त्या शेतकऱ्यांना उसनवारीवरच संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. त्यातच सध्या बी-बियाणे व औषधी दुकानदारांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला आहे. एवढ्या कष्टाने कमावलेला कापूस मातीमोल दरात विकण्यासाठी शेतकऱ्यांचे मन धजावत
त्यामुळे शेतकरी ज्यांच्याकडून उसनवारीने पैसे घेतले त्यांना उद्या उद्या नाही. म्हणून आजचे देणे उद्यावर ढकलत आहे. कापसाचे भाव मात्र वाढण्याऐवजी सारखे पडत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांसमोर आता कापूस विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मागील आठवड्यात कापसाच्या दरात आठ दहा दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. गतवर्षी कापसाला विक्रमी भाव मिळाल्याने कापसाचा यंदा पेरा वाढला. मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने कापसाचे नुकसान झाले. दोन वेचणीत कापसाचा झोडा झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची पिके उपटून गहू व हरभरा पेरला.
कापसाचे उत्पादन घटल्याने जो कापूस घरात आहे. त्या कापसाला चांगला भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला आहे .मात्र कापसाच्या दरात चारशे ते पाचशे रुपयांनी घट झाली असून कापूस बाजारावरील दबाव अद्यापही कायम आहे. दिवसभरात कापूस दरात चढउतार होत आहेत. अंतराष्ट्रीय बाजारपेठेतही कापसाच्या दरात चढउतार होत असल्याने याचा पडसाद स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
