
सहसंपादक : – रामभाऊ भोयर
प्रशासकीय उच्च पदस्थ सेवेत कार्यरत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रभावित होऊन गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य त्यांनी समर्पण भावनेने स्वीकारले. गावखेड्यांमध्ये जाऊन त्यांनी भजनगायन, हार्मोनियम, तबला, ढोलक, बासरी अशा वाद्यांद्वारे संगीत सेवा करत जनजागृतीचे कार्य केले.
आपल्या कलेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत बळीराजा चेतना अभियानात सक्रिय सहभाग घेतला. जिल्ह्यातील अनेक गावांत त्यांनी समाजप्रबोधन व जागृतीचे कार्य केले. समाजाला दिशा देणारे भजनगायक, कीर्तनकार, पथनाट्य कलाकार अशा संघटित व असंघटित कलावंतांमध्ये आजही अनेक जण विकासाच्या प्रवाहापासून दूर असून, राजाश्रयालाही मुकले आहेत, हे त्यांनी जवळून अनुभवले.या पार्श्वभूमीवर कलावंतांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे या उदात्त हेतूने कार्य करणाऱ्या अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीमध्ये त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कलेचा व्यासंग, जिल्ह्यातील कलावंतांशी असलेला सखोल संपर्क आणि प्रभावी कार्य पाहून त्यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे आदेश समितीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. श्याम खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली व विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भवरे यांच्या हस्ते देण्यात आले.राजेश मडावी यांच्या या निवडीचे जिल्हाभरातील विविध कलावंतांनी स्वागत व अभिनंदन केले आहे. यामध्ये जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोड, वारकरी कलावंत आघाडीचे प्रमुख ह.भ.प. दिगंबर गाडगे महाराज, उपाध्यक्ष गुणवंतराव लडके, महासचिव रमेश वाघमारे, जिल्हा संघटक अशोकराव उमरटकर, तसेच तालुका पातळीवरील सर्व अध्यक्ष व महिला कलावंत आघाडीचे पदाधिकारी यांचा समावेश आहे.कलावंतांच्या प्रश्नांसाठी कार्य करताना संस्थापक अध्यक्ष सोमनाथदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मनोभावे सेवा करण्याचे राजेश मडावी यांनी मनोगत व्यक्त केले.
