यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
केंद्र शासनाने या वर्षी ही एच टी बी टी या नवीन तंत्रज्ञानाने विकसित कापूस बियाणे लागवडीस परवानगी दिली नाही. मागील 2008 साली जे तण प्रतिबंधित बियाणे भारतात शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळणार होते, ते बियाणे आजही शेतकऱ्यांना लागवडीसाठी मिळत नाही. याचा निषेध म्हणून शेतकरी संघटनेने सविनय कायदेभंग आंदोलन 10 जून रोजी गुजरात सिमेवर नंदूरबार येथे आंदोलन करून गुजरात राज्यातून प्रतिबंधित H T B T बियाणे महाराष्ट्रात आणले. या आंदोलनाचा पुढचा टप्पा आणि ” शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाने विकसित बियाणे नाकारणा-या सरकार चा निषेध म्हणून आणी ” शेतकऱ्यांना बियाणे निवडीचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे” या मागणीसाठी प्रतिबंधीत बियाण्याची लागवड” व “तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळावा” दिनांक १७ जुन रोजी दुपारी 12 वाजता राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात खडकी ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे आयोजित केला आहे.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते अँड वामनराव चटप (माजी आमदार), शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा बहाळे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी डी मायी आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट,महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुसूदन हरणे , विज्ञान आणि तंत्रज्ञान विस्तार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद दामले, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा प्रज्ञाताई बापट, शैलाताई देशपांडे, सीमाताई नरोडे, अँड दिपक चटप, विजय निवल आंदोलनाचे नेतृत्व करणार असुन, , सतिश दानी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली मरगडे, देवराव पाटील धांडे, दशरथ पाटील, भास्करराव महाजन, उल्हास कोटमकर, गणेश मुटे, सारंग दरणे, दत्ताजी राऊत, धोंडबाजी गावंडे, मुकेश धाडवे, हेमंत इसनकर, अरविंद राऊत, हेमराजजी ईखार, देवेंद्र राऊत, दीपकअन्ना आंनदवार, चंद्रशेखर देशमुख, बालाजी काकडे, इदरचंद बैद, , किसनराव पावडे, गजानन पारखी,बबनराव ठाकरे, दशरथ खैरे, हेमंत ठाकरे, गजानन ठाकरे, युवा आघाडी चे अक्षय महाजन, गोपाल भोयर, विक्रम फटींग, किशोर झोटींग, डॉ श्यामसुंदर गलाट, सुरेश आगलावे, यांच्या सह जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते युवा आघाडी कार्यकर्ते, महिला आघाडी सह शेतकरी सहभागी होतील. अशी माहिती यवतमाळ जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना राजेंद्र झोटींग यांनी दिली.
