
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये “कही खुशी, कही गम” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील सहा पंचायत समिती गट आणि तीन जिल्हा परिषद गटांसाठी आरक्षण जाहीर झाले. पंचायत समिती गटांमध्ये —
झाडगाव : इतर मागासवर्गीय महिला
वरंध : अनुसूचित जाती पुरुष
खैरी : सर्वसाधारण
वाढोणाबाजार : सर्वसाधारण महिला
जळका : अनुसूचित जाती महिला
धानोरा : सर्वसाधारण
तर जिल्हा परिषदेच्या तीन गटांसाठी आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर झाले —
जळका गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
झाडगाव गट : अनुसूचित जमाती
खैरी गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
पंचायत समितीचे आरक्षण उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर जिल्हा परिषदेचे आरक्षण यवतमाळ येथे काढण्यात आले. आरक्षणाच्या या निकालामुळे काही इच्छुक उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर काहींची उमेदवारीच बाद झाल्याने निराशेचे वातावरण दिसून आले.
आगामी निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसत आहेत.
