ईनरव्हिल क्लब हिंगणघाट चे वतीने बेघर निराश्रीत आश्रमात वृक्षारोपन व वाढदिवस

प्रतिनिधी:दिनेश काटकर हिंगणघाट

हिंगणघाट:-स्थानिक ईनरव्हिल क्लबचे वतीने नगरपालिका अंतर्गत निराश्रीत लोकांसाठी निवारा आश्रमात क्लबच्या सदस्या डाँ.साै रुपल कोठारी यांनी आपला मुलगा नम्रचा वाढदिवस आश्रमात साजरा केला.
या आश्रमात असलेले लोक आपल्या कुटुंबापासुन अनेक वर्षापासुन दुर आहेत त्यामुळे त्यांना कुटुंबातील आनंदाचे क्षण उपभोक्ता आले नाही हाच विचार करुन डाँ साै.कोठारी यांनी हा उपक्रम केला.त्यामुळे तेथिल लोकांना आपण आपल्याच कुटुंबातील सदस्या बरोबरच आहोत हा आनंद त्या लोकांच्या चेहर्‍यावर दिसत होते हे पाहुन आम्हालाही समाधान वाटले.
तसेच आश्रमाच्या परीसरात वृक्षारोपण व फळभाजिच्या बिजांचे रोपण करुन हा परीसर हिरवागार करण्याचा मानस क्लबच्या अध्यक्षा साै.संतोष डालिया यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
आश्रमातील लोकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी क्लबच्या सदस्यांनी असे अनेक उपक्रम राबविण्याचा विचार बोलुन दाखविला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबच्या पुर्वाध्यक्षा साै.वर्षा बोंगिरवार,रिया चंदाराणा पुर्वाध्यक्षा साै.छाया लाहोटी शोभा बोथरा यांनी परीश्रम घेतले.