व्यसनमुक्ती मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शनी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त संत तुकडोजी महाराज प्राथमिक शाळा राळेगाव येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तर्फे व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन व पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.शिक्षकांनी महाराजांविषयी भजन शृंखला वाहिली. विद्यार्थ्यांचे भाषण संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्योती चापले मॅडम (सौ.येनोरकर) ,प्रमूख उपस्थिती मुख्या. उमेश बुरले प्रमुख अतिथी म्हणून ॲड.रोशनी वानोडे (सौ कामडी)यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी विद्यार्थ्यांना व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम सांगून जे वाईट आहे त्याच्या दूर राहा असा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली पारडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करता देवनाथ वानोडे , आनंद रामटेके , राहुल सोयाम , उमेश बुरले , अमोल पाहुणे, श्री गणेश वरुडकर, प्रियंका जाधव, भावना जीवतोडे, यांनी सहकार्य केले विद्यार्थ्यांना कार्यक्रमानंतर खाऊ वाटप करण्यात आला, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणेश वरुडकर यांनी केले. राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.