
सहसंपादक : रामभाऊ भोयर
खैरी :- मागील दोन ते तीन वर्षांपासून सुरु असलेले खैरी ते गोटाडी सिमेंट रोडच्या कामाला आता निवडणूक निवडणूक बिगुल वाजताच मुहूर्त मिळाला. अखेर रोडच्या दोन्ही बाजूकडील भागाला उतार काढायला वेळ मिळाला पण तोही सुद्धा पूर्ण केला नाही हे विशेष!. पण रोडच्या दोन्ही बाजूचा भराव भरणार अजून पूर्णपणे भरला फक्त उतार काढून फक्त निवडणूकपुरता स्टंट करणार आहे. तसेच ह्या रोडच्या बाजूला खैरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा असून त्या शाळेसमोरील नालीवर रक्ता टाकण्यात आलेला नसून शिक्षकांनीच त्यावर पाटा टाकून मुलांना जाण्यासाठी रस्ता केला मात्र मालेगाव बांधकाम विभागाला त्या शाळेसमोर पटा टाकण्याचे अवचित साधले गेले नाही.
सदर रोडचे तथा दर्जाहीन नालीचे अपूर्ण काम कधी पूर्ण होणार याकडे खैरी वासियांचे लक्ष लागले आहे. तसेच या रोडच्या कामाला जवळपास तीन वर्ष झाले आहे. परंतु वर्षपूर्ती होत नाही तोच ठिकठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. पण प्रशासनाला वेळ कुठे आहे पाहणी करायला. एका झाडाच्या अभिरंगाही तथा निकृष्ट दर्जाच्या कामापुढे बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी इतके हतबल का? निधीचा अपव्यय होत असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. या निकृष्ट कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. तसेच खैरी गावाच्या विकासाकडे स्थानिक आमदार तर दुर्लक्षच केल आहे. त्यांनी तर ठरवलंच की ज्या गावात विधानसभेला मतदान कमी मिळालं त्या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करायच. अशी सद्या गावकऱ्यात चर्चा सुरु आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती दुरुस्ती करावी कारण की ह्या रोडने कोळशाचे व वैध व अवैध रेतीचे दिवस रात्र प्रकटीपरची वाहतूक सुरू असते.
ह्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे बन्सी सोनवणे यांचे घरासमोर खड्डा व खडके पडले असून त्या ठिकाणी बऱ्याच दुचाकी स्वरांचा अपघात सुद्धा झाला हे विशेष! यासाठी त्या ठिकाणी शासन प्रशासनाचे लक्षवेधीत करण्यासाठी वृक्षाची सुद्धा लागवड केली होती परंतु निष्क्रिय अधिकारी व प्रशासनाने याची कोणतीह दखल घेतली नाही व तो खडक अजूनही तसाच आहे. आतापर्यंत दोन ते तीन अधिकारी बदलले परंतु रस्त्याची अवस्था दयनीय आहे. याकडे मालेगाव बांधकाम विभाग कसे लक्ष देते व रस्त्याचे काम कधी त्वरित दुरुस्ती व पूर्ण करते याकडे खैरी ग्राम ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे.
खैरी ते गोधडी अंतर्गत रस्त्यावर रस्त्यावर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा होती व त्या शाळेत जाण्यासाठी या रस्त्यावरील आल्यावर रपटा टाकून होता. परंतु रपट्याच काम चालू झाल्यानंतर तो रपटा उकडून फेकण्यात आला आता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा ही सुरू झाली असून शाळेसमोर नालीचे बांधकाम करण्यात आले परंतु शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे यांनी तो रट्टा बनविण्यासाठी तत्कालीन बांधकाम अधिकारी अधिकारी श्री ओचावार यांच्याकडे दूरध्वनी द्वारे चर्चा करून मुरूम व रपटा टाकण्याची मागणी धरून लावली परंतु जिथे दोन ते तीन टिप्पर मुरूम भरावयास पाहिजे होता तिथे एकच ट्रॅक्टर मुरूम टाकून नालीशी मुरुमाची लेवल लावण्यात आली मात्र कोणताही रक्त टाकला नाहीये. तर मुलांना शाळेत जायची सुविधा झाली पाहिजे म्हणून शाळेमध्ये बांधकाम विभागाचे असलेले फायबर हार्ड बोर्ड चे दोन तीन बोर्ड टाकून मुलांना जाण्या येण्यासाठी मार्ग केला. मात्र ते बॉक्स मोडके असल्यामुळे उद्या कोण्या विद्यार्थ्यांचे त्या फुटक्या बॉक्समध्ये पाय अडकू कोण्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास याची जबाबदारी मालेगाव बांधकाम विभाग घेणार का असा प्रश्न खैरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे यांनी केला. आणि जर पुढे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार मारेगाव विभाग सर्वस्वी जबाबदारी ही मारेगाव बांधकाम विभागाची राहील असे त्यांनी म्हटले आहे. कारण की याआधी मातेगाव बांधकाम विभागाचे अभियंता तत्कालीन अभियंताओचावरसाहेब यांना याबाबतीत सुचिता केलेली आहे परंतु आता अभियंता बदललेली आहे ते तरी याकडे लक्ष देतील का? याकडे खैरी ग्राम वासी व शालेय पालक वर्गाचे लक्ष लागले आहे. आणि हा हा शाळेसमोरील रपटा तरीच न टाकल्यास शिक्षण समिती व पालक वर्ग बांधकाम विभाग मारेगाव यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडल असा इशाराही दिला आहे
