मोकाट जनावरांना आवरा हो, उभ्या पिकांची होत आहे नासाडी

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

सद्यस्थितीत शहरासह आजूबाजूच्या भागात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला असून या जनावरामुळे शहराच्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना त्रास होत आहे तेव्हा या मोकाट जनावरांना आवरा हो असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. शहराच्या आजूबाजूला असलेल्या लेआउटला लागून शेतकऱ्यांची शेत आहेत . या शेतकऱ्यांना मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे मोकाट जनावर हे रात्रभर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चरतात .शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः धुमाकूळ घालतात शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करतात खाने कमी व तुडवण जास्त अशा पद्धतीने हे जनावर शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची नासधूस करीत आहेत . रात्रभर जनावरे शेतात चरतात व सकाळी घरी जातात शेतकरी सकाळी जेव्हा आपल्या शेतात जातो तेव्हा शेतातील दृश्य पाहून तो कपाळाला हात मारतो अनेक वेळा शेतकऱ्यांना सकाळी दहा-वीस मोकाट जनावरांचा कळप आपल्या शेतात दिसतो एवढ्या मोठ्या जनावरांना हाकलने किंवा बाहेर काढणे हे एकट्या शेतकऱ्याला शक्य नाही जनावरांना हाकतानाही पिकाचे बरेच नुकसान होते आता मोकाट जनावरांच्या व्यवस्थेसाठी शेतकऱ्यांनी शेतात जागली जावे का ? मोकाट जनावरांमुळे शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत . एवढे निश्चित पूर्वी राळेगाव मध्ये ग्रामपंचायत असताना मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा होता . मोकाट जनावरांना शेतकरी कोंडवाड्यात नेत असे कोंडत असे तेव्हा ग्रामपंचायत मोकाट जनावर मालकांना दंड लावत तीन वेळा जर संबंधित जनावर मालकाचे जनावर कोंडवाड्यात आले तर त्याच्यावरती गुन्हे दाखल होत होते . ज्याच्या केसेस अनेक वर्ष चालत होत्या दंडाच्या भीतीने म्हणा किंवा केसेसच्या भीतीने जनावर मालक आपले जनावर बांधून ठेवत असे किंवा त्या पद्धतीची काळजी घेत होते सद्यस्थितीत शहरांमध्ये नगरपंचायत आहेत . मोकाट जनावरावरती मात्र कोणाचाही अंकुश राहिला नसल्याने हे जनावर राजरोसपणे दुसऱ्याच्या शेतात चरतात व दंडाचा किंवा फौजदारी गुन्ह्याचा कुठलाही वचक नसल्याने जनावर मालकही त्याकडे कानाडोळा करत आहे पण यामध्ये शेतकऱ्यांचे मात्र मरण होत असल्याने मोकाट जनावरांना आवरा हो असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावरती आली आहे .प्रतिक्रिया जानराव गिरी उपाध्यक्ष नगरपंचायत कोंडवड्याबद्दल पहिल्याच मिटिंगमध्ये ठराव झाला पण निधीअभावी त्याचे काम रखडले आहे या मिटिंगमध्ये त्यावर कार्यवाही करून कोंडवाडा सुरू करू याशिवाय मोकाट जनावर मालकांनी त्यांची गुरेढोरे ,जनावर ही घरी बांधावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही नगरपंचायत कधीही धडक कार्यवाही करून अश्या जनावरांना पकडण्याची मोहीम राबवेल व कार्यवाही करेल.