
नोकरीवर घेतले नाही म्हणून बी इस इस्पात च्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्याला मारहाण, सरपंच उपसरपंच सह अन्य गावकऱ्यांवर गुन्हे दाखल
मजरा गावाजवळ असलेल्या चंद्रपूर नागपूर महामार्गावरील बी इस इस्पात कंपनीच्या व्यवस्थापण अधिकाऱ्याला दिनांक 21 नोव्हेंबर रोजी तंटामुक्त समिती अध्यक्ष ,सरपंच व 30 ते 40 नागरिकांनी घेरले व आम्हाला कामावर का घेत नाही असे म्हणत मारहाण केली. या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापक मनीष कातंगळे यांच्या तक्रारीवरून एकूण 21 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजरा गावालगत असलेल्या बी एस इस्पात ही कंपनी 2012 मध्ये कंपनी बंद झाली होती.त्यानंतर कंपनी मालकाने ही कंपनी पुन्हा कार्यरत करण्याचे ठरविले त्यानुसार सर्व मशीनरीज नव्याने बसविण्याचे काम मागील काही महिन्यापासून सुरू झाले.गावालगत असलेल्या कंपनीत गावातीलच काही युवा तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालीं आहे.पावसाळ्यात कोळसा पुरवठा कमी झाल्याने कंपनीने काम बंद केले आहे.तसेच मागणीनुसार पुन्हा सर्व कामगारांना कामावर घेत काम कासवगतीने सुरू झाल्याने त्यातील 10 कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे ठरले.
दिनांक 21 नोव्हेंबर रोजी गावकाऱ्यांसह सरपंच,उपसरपंच ,हर्षल निब्रड,तंटामुक्ती अध्यक्ष ,धनंजय वांढरे, सुभाष लढोदीया,संजू सुखदेवे,,राहुल बोढे सह 10 ते 12 नागरिक कंपनीच्या गेटवर एकत्रित येत आमच्या 45 लोकांना कामावर घ्या अन्यथा कंपनी जाळून टाकू अशी धमकी दिली. कंपनी व्यवस्थापक मनीष कातंगळे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तुम्ही कामावर कसे घेत नाही म्हणत लाथा बुक्यांनी मारहान केली.
