
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती निमित्य छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ठाणेदार शितल मालते यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच संगीता पिंपरे यांनी जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली वेशभूषा स्पर्धेत अवंती चौधरी द्वितीय क्रमांक रोशनी कामडी. तृतीय क्रमांक सुजाता वाठोडे यांनी पटकाविला
दोरीवरील उड्या स्पर्धेत प्रथम क्रमांक राजश्री आकाश ताठे द्वितीय क्रमांक सुनिता अरविंद तामगाडगे तृतीय क्रमांक तेजस्विनी पोटदुखे यांनी पटकाविला सर्व यशस्वी स्पर्धकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रप्रमुख अहिल्या माकोडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणेदार शितल मालटे ॲड पूजा देशमुख यांनी विचार व्यक्त केले स्पर्धेचे परीक्षण संगीता पिंपरे . वैशाली उजवणे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नुपूर कोमेरवार यांनी कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा कोठारे तर आभार प्रदर्शन पूर्वा राऊत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मा जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले
