राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सराटी येथील शेतकरी नारायण लक्ष्मन शहारे यांचे शेत गावाला लागूनच असलेल्या गोठ्याला काल रात्री अंदाजे 8.30 वाजता शेतातील गोठ्याला आग लावली या आगीत शेतातील 90 स्पिंकलर पाईप मोटर तसेच गुरांचा चारा जळून खाक झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आज रस्त्याने ऐ जा करनाऱ्या नागरिकांना हि आग दिसताच शेतकरी नारायण शहारे यांना फोन करून आगीची माहिती दिली तो पर्यंत गुरांचा गोठा पुर्ण पने जळून खाक झाला.आज रोजी शेतकरी आशीष शहारे यांनी राळेगाव पोलिस ठाण्यात रितसर तक्रार केली .पुढिल तपास राळेगाव ठाणेदार शितल मालते यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुभाष काळे , निलेश पवार हे करित आहे अज्ञात आरोपी विरूद्ध राळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.