सहसंपादक: रामभाऊ भोयर
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या मार्गदर्शक पत्रानुसार राळेगाव परिसरातील इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान व कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी शाळा जोडणी कार्यक्रमाचे चे आयोजन बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी इंदिरा गांधी कला/विज्ञान महाविद्यालय, राळेगाव येथे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत आय उच्च शिक्षणातील नव्या शैक्षणिक सुधारणा, बहुविषयक अभ्यासक्रम रचना, कौशल्याधिष्ठित शिक्षण, विविध पदवी अभ्यासक्रम, करिअरच्या संधी तसेच प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे
तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक विद्यार्थ्यांना विज्ञान व कला शाखेतील शिक्षणाच्या संधी, स्पर्धा परीक्षा, संशोधन क्षेत्र, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच डिजिटल शिक्षणाविषयी माहिती देणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल तरी या शाळा जोडणी कार्यक्रमाला
राळेगाव परिसरातील सर्व शाळांमधील इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. कपिल जगताप व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए . वाय . शेख यांनी केले आहे.
