
सहसंपादक : रामभाऊ भोयर
प्रेरणा ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून गेली 25 वर्षे समाजातील दुर्लक्षीत व वंचीत घटक अपंग,एकल व आदिवासी महिलां, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिलांच्या उत्थानाकरीता करीत असलेल्या कार्याची दखल घेवून नॅशनल फाऊंडेशन फॉर इंडिया मार्फत भारतरत्न सी. सुब्रमण्यम सामाजिक नेतृत्व पुरस्कार दि. 16 फेब्रू. 26 ला इंडिया हॅबीटेट सेंटर नवी दिल्ली येथे सत्यानंद मिश्रा माजी आयएएस अधिकारी व चेअरमन एन एफ आय यांचे हस्ते व
प्रमुख पाहूणे डॉ. रश्मी सिंघ आय ए एस अधिकारी, पॉल दिवाकर दलीत अँक्टीव्हीस्ट, डोलोन गांगूली, बोर्ड ऑफ ट्रस्टी यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
मागिल 23 वर्षा पासून भारतरत्न सी. सुब्रमण्यम सामुदायिक नेतृत्व पुरस्कार महीला सक्षमीकरण, सामाजिक न्याय व बंधुत्व या विषयावर प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेतृत्व करणार्यास दिला जातो.
माधुरी खडसे-डाखोरे अनेक वर्षापासुन महिलांचे बचत गट स्थापन करून सामाजिक व आर्थिक सक्षम करण्याचे काम करीत आहे, आदिवासी गावामध्ये महीला आरोग्य कार्यकर्ता प्रशिक्षित करून महीला व बालकांचे आरोग्य सुधारणे व गावपातळीवर शासकीय आरोग्य सेवा प्रभावीपणे राबविण्याचे काम केले. परसबाग उपक्रम राबवून विषमुक्त व सकस आहार उपलब्ध करून महीलांना एनीमीयामुक्त करणे. अपंग व एकल महीलांना समाजात सन्मान जनक वागणूक मिळावी व त्यांची उपजिविका निर्माण व्हावी या करीता नियमित काम सुरू आहेत.
सी. सुब्रमण्यम पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे स्वरुप आहे.,
